Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

The Kashmir Files: मुंबई उच्च न्यायालयाचा रिलीजला स्थगिती देण्यास नकार

The Kashmir Files: मुंबई उच्च न्यायालयाचा रिलीजला स्थगिती देण्यास नकार
, मंगळवार, 8 मार्च 2022 (19:43 IST)
द काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या रिलीज वर स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट 11 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. याचिका फेटाळल्यानंतर चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. 
 
काश्मीर फाइल्स चित्रपटाची कथा 1990 च्या दशकात खोऱ्यातील काश्मिरी पंडितांची हकालपट्टी आणि या काळातील राजकीय वातावरणावर आधारित आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पुनीत इस्सार, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका  दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये चित्रपटाचा आशय एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात असल्याचे सांगून त्याचे प्रदर्शन थांबविण्याची विनंती करण्यात आली होती. 
 
उत्तर प्रदेशातील रहिवासी इंतेझार हुसैन सय्यद यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर मुस्लिम समाजाचे चुकीचे चित्रण करतो आणि काही दृश्ये समाजातील कटुता वाढवतात असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेत चित्रपटाला एकतर्फी म्हटले आहे. 
 
द कश्मीर फाइल्सच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या हार्ड हिटिंग चित्रण साठी त्याची खूप प्रशंसा केली जात आहे. काही राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळालेल्या काश्मीरमध्ये स्वातंत्र्याची मागणी करत असताना फुटीरतावादी शक्तीचा जोर  असल्याचं  ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले आणि त्यांना काश्मीर सोडण्यास भाग पाडले. अनुपम खेर काश्मिरी पंडितांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कपिल शर्मावर दाटले वादाचे ढग, दिग्दर्शकाने कॉमेडियनवर केले गंभीर आरोप