Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'लेके प्रभु का नाम' टाइगर 3 ट्रॅक तुम्हाला आवडेल

Tiger 3 Song Leke Prabhu Ka Naam
टाइगर 3 मधील लेके प्रभु का नाम या पार्टी ट्रॅकसह सलमान आणि कतरिना परत आले आहेत, जो तुम्हाला आनंदित करेल.
 
टाइगर 3 च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी लगेच पसंती दिली आणि आता निर्माते 'लेके प्रभु का नाम' या पहिल्या गाण्याचे अनावरण करून उत्साह वाढवण्याच्या तयारीत आहेत जे सोमवारी प्रदर्शित होणार आहे.
 
पहिले गाणे अरिजित सिंग आणि निखिता गांधी यांनी गायलेले डांस नंबर आहे ज्यात सलमान आणि कतरिना कैफ आहेत, दुसरे गाणे एक रोमँटिक ट्रॅक आहे जे प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श करेल!
 
दिग्दर्शक मनीश शर्मा म्हणतात , “आम्ही पुढच्या आठवड्यात लेके प्रभु का नाम येण्याची वाट पाहू शकत नाही! कतरिनाचे अलौकिक सौंदर्य आणि दोघांमधील केमिस्ट्री यामुळे प्रत्येकाला नाचायला लावणारा फॉर्मूला आहे ! आम्‍ही टर्कीच्‍या कॅप्‍पाडोशियामध्‍ये खूप मजा केली आणि सलमान आणि कतरिनाने सोबत मिळविल्‍या यशाच्‍या यादीत भर घालणारा हा आणखी एक मोठा डान्‍स चार्टबस्‍टर ठरेल.”
 
टाइगर 3 यावर्षी 12 नोव्हेंबर, रविवारी रिलीज होणार आहे!
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिअॅलिटी शोमध्ये नवर्‍याने दुर्लक्ष केले, अंकिता ढसाढसा रडली