Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आज त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा करत आहे

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आज त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा करत आहे
, शुक्रवार, 7 मार्च 2025 (13:17 IST)
Anupam Kher Birthday : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा जन्म ७ मार्च १९५५ रोजी शिमला येथे झाला. अनुपम खेर हा असाच एक अभिनेता आहे ज्याला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक नाकारले गेले आणि संघर्ष करावा लागला. तसेच अनुपम खेर हे हिंदी चित्रपटांसोबतच इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि पंजाबी भाषेतील चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ओळखले जातात. या अभिनेत्याने आतापर्यंत इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे.
ALSO READ: प्रसिद्ध तेलुगू गायिका कल्पना राघवेंद्रने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
तसेच अनुपम खेर यांनी फक्त ३७ रुपये घेऊन घर सोडले होते आणि स्वप्नांच्या शहरात, मुंबईत आले. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. एवढेच नाही तर त्यांना अनेक रात्री प्लॅटफॉर्मवर काढाव्या लागल्या. अनुपम खेर पहिल्यांदा १९८४ मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले जेव्हा त्यांनी वयाच्या २९ व्या वर्षी 'सिनॉप्सिस' चित्रपटात ६५ वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली. या चित्रपटातील अभिनेत्याच्या अभिनयाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
अनुपम खेर यांनी १९८५ ते १९८८ पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु त्यांना यश मिळाले नाही. पण जेव्हा त्यांनी तेजाबमध्ये माधुरी दीक्षितच्या वडिलांची नकारात्मक भूमिका साकारली तेव्हा प्रेक्षकांनी त्यांचे कौतुक केले. या चित्रपटानंतर अनुपमने बॉलिवूडला अनेक उत्तम हिट चित्रपट दिले, यापैकी बहुतेक चित्रपटांमध्ये ते नकारात्मक भूमिकांमध्ये दिसले. तसेच 'अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये हा अभिनेता कॉमिक भूमिकांमध्ये दिसला. या अभिनेत्याला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्री आणि पद्मभूषणसह आठ फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
ALSO READ: सोन्याच्या तस्करीप्रकरणी अभिनेत्रीला अटक

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Women's Day ला मुंबईतील या तीन ठिकाणी नक्की भेट द्या