Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Annaatthe Trailer रजनीकांत यांच्या 'अन्नत्थे' चा चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

trailer of Annaatthe released
, गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (11:30 IST)
नुकताच सुपरस्टार रजनीकांत यांच्या  'अन्नत्थे' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील रजनीकांत यांची भूमिका पाहून या प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. 'अन्नत्थे' या चित्रपटाचा टीझर 14 ऑक्टोबर रोजी या चित्रपटांचे निर्माते बीए राजू यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.
 
रजनीकांत यांचा  'अन्नत्थे'  या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबतच  प्रकाश राज, जगपति बाबू, वेला राममूर्ति आणि सूरी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच चित्रपटात मीना, खुशबू सुंदर, नयनतारा  आणि कीर्ती सुरेश या अभिनेत्रींनी महत्वाची भूमिका साकारली आहे.
 
हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता धनुष, शिवकार्तिकेयन, खुशबू सुंदर, धनंजयन, साक्षी अग्रवाल या सर्वांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून रजनीकांत यांना त्यांच्या 'अन्नत्थे' या आगामी चित्रपटाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच सुपर स्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'ओव्यांच्या खजिन्या’ने दिवाळी होणार चैतन्यदायी