Festival Posters

ट्युबलाईटचा सर्वात कमी कमाईचा विक्रम

Webdunia
सलमान खानचा ईदला प्रदर्शित होणारा प्रत्येक चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर विक्रम करत असल्याचा  आजवरचा इतिहास आहे. मात्र, या ईदला प्रदर्शित झालेल्या ट्यूबलाईटला यश मिळालेले नाही. पहिल्या तीन दिवसात आजवरचा सर्वात कमी कमाईचा आकडा चित्रपटाने गाठत सलमानच्या ट्युबलाईटने आगळावेगळा विक्रम केला आहे.
23 जून रोजी चित्रपट प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 21.15, शनिवारी 21.17, तर रविवारी 22.45 कोटी इतकी कमाई केली आहे. आजवरचा सलमानच्या चित्रपटाचा नीचांक नोंदवत ट्यबलाईटने पहिल्या तीन दिवसात एकूण 64.77 कोटी इतकी कमाई केली आहे. ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्शने ही आकडेवारी ट्‌विटरवर जाहिर केली आहे. सलमान खानच्या आजवर ईदला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची पहिल्या तीन दिवसांची कामगिरी पुढील प्रमाणे आहे.
 
बॉडीगार्ड – 2011 – 88.75 कोटी
एक था टायगर – 2012 – 100.16 कोटी
किक – 2014 – 83.83 कोटी
बजरंगी भाईजान – 2015 – 102.60 कोटी
सुल्तान – 2016 – 105.53 कोटी
ट्यबलाईट – 2017 64.77 कोटी.
सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंग नागपूर येथील आरएसएस मुख्यालयात पोहोचला, मोहन भागवत यांच्यासोबत एक विशेष बैठक

'धुरंधर: द रिव्हेंज' भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला, रणवीर सिंग ₹१००० कोटींच्या हिंदी नेट क्लबमध्ये पोहोचणारा पहिला अभिनेता

Gangotri Wildlife Sanctuary उत्तराखंडमधील प्रसिद्ध आणि भव्य पर्यटन स्थळ; गंगोत्री राष्ट्रीय उद्यान

'राजा शिवाजी'चे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले, चित्रपटाचे 'छत्रपती' हे गीत या दिवशी प्रदर्शित होणार

यश चोप्रा फाउंडेशनकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील कामगारांच्या मुलांसाठी वायसीएफ स्कॉलरशिप प्रोग्राम 2026 ची घोषणा

पुढील लेख
Show comments