Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझ्या आईचे वय 60 वर्षे : नितारा

Webdunia
ट्‌विंकल खन्नाचे वय 60 वर्षे आहे, असे जर कोणी सांगितले तर तुम्हाला हसायला येईल. पण ट्‌विंकलची मुलगी निताराच्या मते तिच्या आईचे वय 60 वर्षे आहे. हे ऐकून ट्‌विंकललाच हसायला आले. झाले असे की 4 वर्षाच्या निताराच्या शाळेमध्ये “मदर्स डे’च्या निमित्ताने एक उपक्रम आयोजित केला गेला होता. त्यामध्ये सगळ्या मुलांना आपल्या आईबद्दल काही तरी लिहायला सांगितले होते. गाळलेल्या जागा भरण्याच्या एका फॉर्ममध्ये निताराने आपल्या आईचे, म्हणजे ट्‌विंकलचे वय 60 वर्षे असल्याचे लिहीले. याशिवाय आई दिवसभर कॉम्प्युटरवर बसून काम करते आणि खूप चांगली कॉफी करते, असेही निताराने लिहीले आहे. आई घरातली सगळी कामे करते आणि माझ्यासाठी टिफीनही करून देते, म्हणून ती अगदी “सुपर’ आहे, असेही निताराने लिहीले आहे. निताराच्या बालबुद्धीने ट्विंकलने अगदी स्वभावाप्रमाणे प्रामाणिकपणे दिलखुलास दाद दिली आहे.

एवढेच नव्हे तर इन्स्टाग्रामवर निताराच्या फॉर्मची इमेजही तिने पोस्ट केली आहे. निताराच्या निरीक्षणानुसार आपण कॉम्प्युटर डेस्कला अगदी चिकटून असल्याचेही तिने मान्य केले आहे. आता किमान “वीक एन्ड’ला तरी कॉम्प्युटरला सुटी देण्याचा तिचा विचार आहे. ट्‌विंकलला आरव हा मुलगा आणि मुलगी नितारा अशी दोन अपत्ये आहेत. ऍक्‍टिंग थांबवल्यावर तिने अक्षय कुमारच्या “पॅडमॅन’च्या निर्मिती करायला घेतली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

ज्येष्ठ तमिळ अभिनेते दिल्ली गणेश यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

श्री कनकादित्य मंदिर रत्‍नागिरी

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

मनोकामना पूर्ण करणारे भारतातील प्रसिद्ध 5 सूर्य मंदिरे

पुढील लेख
Show comments