Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

Webdunia
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 (11:54 IST)
महाराष्ट्रात मराठी भाषेवरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. नुकतेच ऑटोचालकांसाठी मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आले असून त्यांना भाषा शिकण्यासाठी ठराविक वेळही देण्यात आला आहे. मात्र, याच दरम्यान बॉलीवूड अभिनेता संजय दत्त यांच्या एका विधानामुळे मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे.
 
काय म्हणाले होते संजय दत्त?
ठाणे येथे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात संजय दत्त सहभागी झाले होते. या वेळी बोलताना संजय दत्त म्हणाले, "मी ६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरीसुद्धा मला मराठी भाषा शिकता आली नाही." विशेष म्हणजे संजय दत्त यांनी हे विधान केले तेव्हा त्यांच्या शेजारी उभे असलेले मंत्री प्रताप सरनाईक हसताना दिसले.
 
भाजपा आमदाराची खरमरीत टीका
या संपूर्ण प्रकारावर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. मेहता म्हणाले की सामान्य रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलण्यासाठी धमकावले जाते आणि त्यांच्यावर दबाव आणला जातो. दुसरीकडे एखादा मोठा कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा मंत्री त्यावर हसतात. हा कोणता न्याय आहे?
 
मंत्र्यांवर हल्लाबोल
प्रताप सरनाईक यांच्या कथनी आणि करणीत खूप फरक आहे, असा आरोप करत त्यांनी सरनाईक यांचा उल्लेख 'डमी मंत्री' असा केला. संजय दत्त यांचे हे विधान आणि त्यावर मंत्र्यांची झालेली प्रतिक्रिया यामुळे आता सत्ताधारी गोटातच आमनेसामने वाद पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

Bigg Boss 20: 'बिग बॉस'चा २०वा सीझन मध्ये मनोज तिवारी यांची मुलगी रीतीची एन्ट्री

'लस्ट स्टोरीज ३' ची घोषणा, या तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

करण जोहर राधा-कृष्णाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार; जाणून घ्या कोण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

ईशा देओल विनोदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार! अभिनेत्री दिसणार या चित्रपटात

सर्व पहा

नवीन

गायक निसार वायनाड यांचे दुबईत वयाच्या ४४ व्या वर्षी निधन

अक्षय-सैफच्या 'हैवान'मध्ये खरा शिकारी कोण आहे? कथा, कलाकार आणि प्रदर्शनाची तारीख जाणून घ्या

Asha Bhosle's Birthday आशा भोसले यांच्या आवाजातील ही १० गाणी आजही रसिकांच्या मनात का आहेत?

वरुण धवन आईसोबत 'हनुमान अंश' पाहण्यासाठी गेला, अभिनेता म्हणाल-"हा केवळ एक चित्रपट नाही, तर एक दिव्य अनुभव आहे"

मुंबईतील हे ठिकाण न्यूयॉर्कलाही टक्कर देते; समुद्राच्या लाटा आणि 'क्वीन्स नेकलेस'ची चमक तुमचे मन मोहून टाकेल

पुढील लेख
Show comments