Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

'उरी' यूपीत करमुक्त, योगींचा निर्णय

'उरी' यूपीत करमुक्त, योगींचा निर्णय
विकी कौशल आणि यामी गौतम अभिनित 'उरी' चित्रपट श्रोता आणि समीक्षकांना खूप आवडले आहे. बॉक्स ऑफिसवर अजूनही चित्रपट चांगला प्रदर्शन करत आहे आणि या दरम्यान चित्रपटाबद्दल चांगली बातमी आली आहे. प्रत्यक्षात, यूपीमधील कॅबिनेट बैठकीत उरी चित्रपट कर मुक्त घोषित केले आहे. 
 
कुंभ क्षेत्रातील कॅबिनेट बैठकीत योगींनी उरीवरून राज्य जीएसटी काढून टाकण्याची घोषणा केली. सरकारच्या या पाउलामुळे उत्तर प्रदेशामध्ये उरीला फायदा होईल, कारण कर मुक्त केल्यानंतर तिकीट दर स्वस्त होतील आणि अधिक दर्शक मूव्ही पाहायला जातील, असा अंदाज बांधला जात आहे. आतापर्यंत हा चित्रपट 160.78 कोटी रुपये कमावून चुकला आहे.
 
* 800 स्क्रीनवर रिलीज झाला हा चित्रपट
25 कोटींच्या बजेटमध्ये बनविलेल्या या चित्रपटाला सुमारे 800 स्क्रीन मिळाल्या होत्या. चित्रपटाची एडवांस बुकिंग देखील चांगली होती. चित्रपटात विकी कौशलचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडत आहे. पूर्वी, चित्रपट ट्रेलर देखील लोकांना खूप आवडला होता. 2016 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यावर भारतीय सेनेच्या प्रतिसादावर आधारित हा चित्रपट चर्चेचा विषय बनलेला आहे.
 
'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' आरएसव्हीपी मूव्हीज निर्मित आणि आदित्य धर दिग्दर्शित आहे. चित्रपटात विकी कौशल एक सैनिक आणि यामी गौतम एक इंटेलिजेंस ऑफिसर यांची भूमिका बजावत आहे. तसेच परेश रावल इंडियन ऑफिसर च्या भूमिकेत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'युथट्यूब' लवकरचप्रेक्षकांच्या भेटीला