Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'अक्‍टूबर' १३ एप्रिलला चित्रपट प्रेक्षकांच्‍या भेटीला

varun-dhawan-upcoming-film-will-release-October-13th-April-2018
, बुधवार, 24 जानेवारी 2018 (11:09 IST)

अभिनेता वरूण धवने  अक्‍टूबर या चित्रपटाचे शूटिंग त्‍याने पूर्ण केले असून १३ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्‍या भेटीला येत आहे. वरूणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्‍ये एक कॅलेंडर दिस असून यात जानेवारी, फेब्रुवारी, मार्चनंतर सरळ ऑक्टोबर महिना दिसत आहे. कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्यावर वरूण आणि बनिता संधूचे चित्रपटातील काही फोटोज ही दिसत आहेत. या व्हिडिओ शेअर करून वरूणने एक कॅप्शनदेखील दिली आहे. त्‍याने म्‍हटले आहे, 'यावर्षी एप्रिल महिन्यानंतर ऑक्टोबर महिना येणार आहे.' याचबरोबर वरूणने चित्रपटाची १३ एप्रिल ही रिलीज डेट जाहिर केली आहे. 

बनिता संधू हा नवा चेहरा 'अक्‍टूबर'मधून दिसणार आहे. ‘डबलमिंट’च्या ‘एक अजनबी हसीना से’ या गाण्यात ती दिसली होती. हे यू-ट्यूबवरील हे गाणे तब्बल ६० लाख लोकांनी पाहिले होते. ‘अक्टूबर’ या  चित्रपटात एक वेगळी आणि हटके कथा  पाहायला मिळणार आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑस्कर पुरस्कार : 'द शेप ऑफ वॉटर' ला 13 नामांकन