Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री अंजना भौमिक यांचे निधन

Webdunia
रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (12:23 IST)
ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री अंजना भौमिक यांचे निधन झाले. अभिनेत्रीला श्वसनाचा त्रास होत होता. आजारी पडल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शुक्रवारी रात्री दक्षिण कोलकाता येथील रुग्णालयात दाखल केले. शनिवारी सकाळी 79 वर्षीय अंजनाने जगाचा निरोप घेतला. अंजना ही अभिनेता जिशू सेनगुप्ताची सासू होती. 
 
अंजना भौमिक यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी नीलांजना आणि जावई जिशू हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. रिपोर्ट्सनुसार, अंजना भौमिक दीर्घकाळापासून आजारी होत्या आणि त्यांना वयाशी संबंधित आरोग्य समस्या होत्या. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून ती अंथरुणाला खिळलेली होती आणि तिच्या मुली नीलांजना आणि चंदना त्यांची काळजी घेत होती. 
 
अंजना भौमिक यांचा जन्म डिसेंबर 1944 मध्ये झाला. अनिल शर्मा नावाच्या नौदल अधिकाऱ्याशी तिचा विवाह झाला होता. त्यांना नीलांजना आणि चंदना या दोन मुली आहेत. मोठी मुलगी नीलांजना ही एकेकाळी तिच्या आईसारखी अभिनेत्री होती, ती टीव्ही शो 'हिप हिप हुर्रे'मध्ये दिसली होती. मात्र, नीलांजनाही अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे आणि पती जिशू सेनगुप्तासोबत कोलकात्यात राहत आहे. 
 
वयाच्या 20 व्या वर्षी अंजना भौमिकने 1964 मध्ये आलेल्या 'अनुस्तुप चंदा' या बंगाली चित्रपटातून पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तिने तिचे नाव बदलून अंजना ठेवले. दिवंगत अभिनेते उत्तम कुमारसोबतच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीसाठी ती ओळखली जात होती. या दोघांनी 'ठाना थेके अस्ची', 'चौरंगी', 'नायका संवाद', 'कभी मेघ' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 'महेश्वेता' (1967) या चित्रपटात सौमित्र चॅटर्जीसोबत अंजनाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. अंजनाने अनेक वर्षांपूर्वी इंडस्ट्रीला अलविदा केला होता. 
 
Edited By- Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रियांका चोप्राच्या 'पानी'चा टीझर लाँच

होंबळे फिल्म्सचा 'बघीरा' चित्रपटगृहांमध्ये या दिवशी खळबळ माजवणार

Ayushmann Khurrana :आयुष्मान अभिनय आणि गायन, कविता लिहिण्याची चांगली आवड ठेवणारा अभिनेता

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट, म्हणाली-आमचे कुटुंब धक्क्यात आहे

दीपिका रणवीर एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले

सर्व पहा

नवीन

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

पांडव लेणी नाशिक

लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट मनोरंजनाची चवदार ‘पाणीपुरी’ चित्रपटगृहात

सलमान खानने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बहीण अर्पितासोबत गणेश चतुर्थी साजरी केली

अभिनेत्री आदिती राव हैदरी सिद्धार्थ लग्न बंधनात बंधले

पुढील लेख
Show comments