Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘शिर्डी वाले साई बाबा’ मालिकेत भूमिका पटकावणारा विनीत रैना म्हणतो: हा एक आध्यात्मिक प्रवास आहे

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन
, शनिवार, 12 एप्रिल 2025 (12:24 IST)
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आपल्या ‘शिर्डी वाले साई बाबा’ या आगामी मालिकेच्या माध्यमातून तुमच्या टीव्हीच्या पडद्यावर भक्ती आणि श्रद्धेचा सुगंध घेऊन येत आहे. विनीत रैना हा प्रतिभावान अभिनेता या मालिकेत शीर्षक भूमिका करत आहे. ही मालिका प्रेक्षकांना एक आध्यात्मिक प्रवास घडवेल. मालिकेत हृदयस्पर्शी कथा, खास शिकवण आणि निर्मळ भक्तीचे क्षण असतील.
 
या मालिकेविषयी सांगताना विनीत रैना म्हणाला, “शिर्डी वाले साई बाबांची भूमिका करण्याची संधी मिळणे हा साईंचाच आशीर्वाद आहे. साई बाबांच्या श्रद्धा आणि करुणा या मूल्यांच्या शिकवणीने मी नेहमीच प्रेरित झालो आहे. त्यामुळे साईंची भूमिका करताना मी नतमस्तक आहे, भारावलो आहे. साईंचे दिव्य अस्तित्व पडद्यावर जिवंत करण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्यासाठी ही केवळ एक भूमिका नाही, तर हा एक आध्यात्मिक प्रवास आहे. आणि या सुंदर कहाणीचा एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. प्रेक्षकांशी माझे सूर जुळतील आणि या भूमिकेच्या माध्यमातून आशा, शांती आणि सकारात्मकता या गुणांचा प्रसार होईल, अशी मी आशा करतो.”
ही मालिका साई बाबांची शिकवण देऊन प्रेक्षकांना एका अविस्मरणीय प्रवासाला घेऊन जाण्याची तसेच हृदयस्पर्शी कहाण्या आणि दिव्य सुजाणता यांची यथायोग्य सांगड घालण्याची हमी देते.
 
हा आध्यात्मिक अनुभव आवर्जून घ्या – बघा, शिर्डी वाले साई बाबा, लवकरच येत आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसिद्ध अकरा मारुती : समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींची माहिती