आपल्या फिल्म इंडस्ट्री मध्ये सध्या सध्या बायोपिकचाच अर्थात व्यक्ती केद्रित जीवनपटचा ट्रेण्ड आला आहे. त्यामुळे एकामागोमाग एक असे बरेच बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येतायेत. यामध्ये आता ‘सुपर ३०’ या आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची येत असून, त्याच्या निर्मितीची जोरदार तयारी आहे. यामध्ये आनंद कुमार यांची भूमिका हृतिक रोशन साकारणार आहे. त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. सोशल मिडीयावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तर या सिनेमाला नावसुद्धा ‘सुपर ३०’ असेच ठेवले आहे. या सिनेमाची मंगळवारपासून वाराणसीमध्ये शूटिंगला सुरुवाती झाली आहे. या सिनेमचे विकास बहल दिग्दर्शिन करत आहे. आनंद कुमार यांच्या भूमिकेला जवळून समजून घेण्यासाठी हृतिकने पाटणाच्या काही आयआयटी शिक्षकांचीही भेट गेतली असून त्याला रोल परफॉर्मन्स चांगला करायचा आहे. पाटणा आणि वाराणसी येथे दहा- दहा दिवस आणि मुंबईतही चित्रपटाच्या बऱ्याच भागाचे शूटिंग होणार आहे.