Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काश्मीर फाइल्सवर शशी थरूर यांचे ट्विट, विवेक अग्निहोत्री यांनी सुनंदा यांचा उल्लेख केला

Shashi Tharoor's tweet on Kashmir files
, मंगळवार, 10 मे 2022 (18:35 IST)
चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि खासदार शशी थरूर यांच्यात 'द काश्मीर फाइल्स'वरून ट्विटरवर भांडण झाले. खरेतर, माजी केंद्रीय मंत्र्याने पोस्ट केले की 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट 'प्रक्षोभक' आणि 'एकतर्फी' असल्याने सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. सिंगापूरस्थित चॅनल न्यूज एशियाचा एक लेख शेअर करत थरूर यांनी ट्विट केले की, भारताच्या सत्ताधारी पक्षाने प्रमोट केलेल्या द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या ट्विटने थरूर यांचा निशाणा भाजपवर होता हे स्पष्ट झाले आहे.
 
 यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी शशी थरूर यांच्या ट्विटवर जोरदार प्रहार केला. त्यांनी लिहिले, "प्रिय fopdoodle (stupid), gnashnab (नेहमी तक्रार करणारे), सिंगापूर हे जगातील सर्वात regressive (मागासलेले) सेन्सॉर आहे. त्याने The Last Temptations of Jesus सारख्या चित्रपटावरही बंदी घातली होती. अगदी रोमँटिक चित्रपट The Leela Hotel Files वर देखील बंदी घातली आहे. कृपया काश्मिरी हिंदू नरसंहाराची चेष्टा करणे थांबवा."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chandramukhi- 'चंद्रमुखी' मधील 'कान्हा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला...