Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Zwigato Trailer Out कपिल शर्माच्या चित्रपटाचा ट्रेलर

Webdunia
बुधवार, 1 मार्च 2023 (16:32 IST)
हल्ली घरी बसून ऑडर करुन जेवण मागविण्याचं ट्रेड वाढतच चालले आहे. एका क्लिकवर ऑर्डर आणि काही मिनिटात दारावर आवडते पदार्थ. पण ही ऑर्डर पुरवणार्‍याची कथा घेऊन आला आहे कॉमेडियन कपिल शर्मा. त्याच्या आगामी 'झ्विगाटो' चित्रपटात दाखवणार आहे की लोकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाइन फूड डिलेव्हरीची सुविधा या व्यवसायातील लोकांसाठी कशा प्रकारे आव्हान बनली आहे. 
 
'झ्विगाटो'च्या ट्रेलरमध्ये ही गोष्ट चांगलीच दाखवण्यात आली आहे. कपिल शर्मा या चित्रपटात फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत आहे. ज्यात तो रेटिंगसाठी धावपळ करताना दिसतो. त्याची मुलगी हे देखील म्हणताना दिसते की 'पापा अगर आप ग्राहक के साथ सेल्फी लेंगे तो आपको दस रुपये एक्स्ट्रा मिलेंगे'. 
 
दोन मुलं, बायको आणि वृद्ध आई या जबाबदाऱ्यांचे ओझे घेत एका माणसाला शेवटी काय काय करणे भाग पडतं हे यात दाखवण्यात आले आहे.
 
फूड डिलिव्हरीच्या संख्येवर आधारित अॅपचे रेटिंग आणि ते रेटिंग टिकवून ठेवण्यासाठी शक्य तितक्या ऑर्डर वितरित करण्याची धडपड यांमध्ये एखादी व्यक्ती किती हताश होऊन अडकू शकते हे ट्रेलर दाखवतो. ग्राहकापर्यंत त्याची ऑर्डर पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी बॉयला हवामान, गर्दी आणि रस्त्यावरील जाम अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 
 
नेहमी हसत राहणारा आणि हसवणारा कपिल शर्मा ट्रेलरमध्ये हताश दिसत आहे. त्यावर घरची जवाबदारी स्पष्ट दिसत आहे. डिलिव्हरी बॉय म्हणून त्याची शैली प्रेक्षकांना किती आवडेल हे तर चित्रपट बघूनच कळेल. नंदिता दास दिग्दर्शित हा चित्रपट 17 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रियांका चोप्राच्या 'पानी'चा टीझर लाँच

होंबळे फिल्म्सचा 'बघीरा' चित्रपटगृहांमध्ये या दिवशी खळबळ माजवणार

Ayushmann Khurrana :आयुष्मान अभिनय आणि गायन, कविता लिहिण्याची चांगली आवड ठेवणारा अभिनेता

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट, म्हणाली-आमचे कुटुंब धक्क्यात आहे

दीपिका रणवीर एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले

सर्व पहा

नवीन

बायको हॉस्पिटलमध्ये

अभिनेता सलमान खानच्या ताफ्यात बाईकस्वार शिरला,गुन्हा दाखल

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

आग्रा : ताजमहाल जवळील प्रेक्षणीय 3 ठिकाणे

पुढील लेख
Show comments