Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जया बच्चन यांनी सांगितले की, प्रथमच सून ऐश्वर्या राय हिला पाहून अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया कशी होती?

jaya bachchan
, बुधवार, 17 जून 2020 (12:29 IST)
ऐश्वर्या राय बच्चन एक बायको आणि आई आहे तितकीच एक सून आहे. ऐश्वर्या तिचे सासू सासर्‍यांचे खूप आदर करते आणि तिचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. त्याचा पुरावा म्हणजे जयाचे हे व्हिडिओ ज्यात ती ऐश्वर्याची स्तुती करताना दिसत आहे. वास्तविक, जयाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती ऐश्वर्याला पाहून बिंग बीची प्रतिक्रिया कशी होती हे सांगत आहे.
 
व्हिडिओत जया म्हणते की, 'अमितजींनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा त्यांना वाटले की श्वेता पुन्हा घरी येत आहे. त्यांचे डोळे चमकले. ऐश्वर्याने श्वेताने रिकामी ठेवलेली जागा भरली.
 
मुलाखतीत जेव्हा करणं जयाला विचारते तेव्हा तुमच्या म्हणण्यानुसार, ऐश्वर्या बच्चन कुटुंबासाठी योग्य निवड आहे का? तर जया म्हणाली, 'हो नक्कीच ... मला वाटते की ती खूप चांगली आहे कारण ती स्वत: हून एक उत्तम व्यक्तिमत्त्व आहे आणि तिची खास गोष्ट म्हणजे ती या नवीन भूमिकेत चांगल्या प्रकारे रुजली आहे'.
 
यापूर्वी फिल्मफेअर अवॉर्डचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाच्या आधीचा आहे. व्हिडिओमध्ये जया म्हणते, 'मी एक हुशार आणि सुंदर मुलीची सासू होणार आहे. ज्या मुलीचा संपूर्ण देशाबद्दल अभिमान आहे, जिचे सर्वात मोठे सौंदर्य तिचे स्मित आहे. आमच्या कुटुंबात आपले स्वागत आहे. मी तुला खूप प्रेम करते '.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्रीचे अफलातून उत्तर !!!