Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साउथच्या डायरेक्टरसोबत का करणार शाहरुख

Why Shahrukh will work with South's director
, गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (15:29 IST)
बॉलिवूडधील किंग खान अर्थात शाहरुख खान हा आपल्या आगामी चित्रपटात साउथमधील प्रसिद्ध डायरेक्टर एटली कुमारसोबत काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसून 'सनकी' असे नाव असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट पुढील वर्षाअखेर प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज आहे. या चित्रपटाच्या नावाची अधिकृत घोषणा चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्यानंतर करण्यात येणार आहे. या चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन सीन असणार असून यातील शाहरुखची भूमिका एकदम हटके अशी असणार आहे. या चित्रपटाबाबत एका कार्यक्रमात तेलुगू लेखक हरीश शंकर म्हणाले, एका लेखकापेक्षा मी एक चाहताम्हणून या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहे. हा चित्रपट कधी पूर्ण होईल, हे मला माहीत नाही. पण एटली सर किंग खान एसआरकेला डायरेक्ट करणार आहेत. 
 
एसआरकेचा चाहता म्हणून या जोडीची मला खूपच उत्सुकता आहे. दरम्यान, एटली कुमारबाबत सांगायचे झाल्यास त्यांनी मल्टीस्टारर 'बिगिल' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा पार केला होता. यात योगी बाबू, जॅकी श्रॉफ, आनंद राज यासारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'गर्ल्स'च्या छबीला मिळणार हजारो 'लाईक्स'