Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोनू सूद राजकारणात येणार?

Webdunia
बुधवार, 15 मार्च 2023 (21:52 IST)
लॉकडाऊन दरम्यान कामगारांना केलेल्या मदतीमुळे सोनू सूदला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर सोनू सूद चर्चेत आला होता. सोनूच्या राजकीय पदार्पणाबाबतही चर्चा रंगल्या होत्या.
 
सोनू सूदने नुकतीच ‘एएनआय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने राजकीय पदार्पणाबाबत भाष्य केलं. राजकारणात पदार्पण करण्याबाबत सोनूला प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सोनूने उपमुख्यमंत्री व खासदार पदासाठी ऑफर मिळाल्याचा खुलासा केला आहे. सोनू म्हणाला, “राजकीय पदार्पणाबाबत बोलायचं झालं तर मला राज्यसभेचा खासदार होण्याची ऑफर मिळाली होती. पण मी ती नाकारली”.
 
“याबरोबरच मला अजून काही पदांच्याही ऑफर मिळाल्या होत्या. एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री पदाचीही ऑफर मला देण्यात आली होती”, असंही सोनू सूद म्हणाला. “मला खूप गोष्टींची ऑफर मिळाली आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळे मला उत्साह मिळत नाही. मी स्वत: माझ्यासाठी नियम बनवतो. कारण, कोणीतरी बनवलेल्या रस्त्यावर चालायला मला आवडत नाही”, असंही सोनू सूदने सांगितलं.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

नवीन

हृतिक रोशनचा मुलगा ह्रेहानचे संगीत क्षेत्रात पदार्पण, कुटुंबाने दिले प्रोत्साहन

पावसाळ्यात तुमच्या जोडीदारासोबत या ठिकाणांना भेट द्या! फिरायला जाण्यासाठी रोमँटिक अशी ५ पर्यटन स्थळे

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

रक्षाबंधन वीकेंडसाठी पुण्याजवळील सर्वोत्तम १ दिवसीय ट्रिप ठिकाणे

हरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या; जिमबाहेर ४ हल्लेखोरांनी झाडल्या २० गोळ्या

पुढील लेख
Show comments