Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?

Suzanne
, गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (11:31 IST)
अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने तिच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम वर एक फोटो पोस्ट केला. सुझानच्या फोटोवर हृतिकने कमेंट केली असून त्याची कमेंट वाचून हे दोघं पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा नेटकर्यांफमध्ये रंगली आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील  या फोटोमध्ये सुझान अत्यंत सुंदर दिसते. मला सर्वोत्तम संधी, सर्वोत्तम मार्गदर्शन दिल्याबद्दल आणि सर्वोत्तम व्यक्ती माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल हृतिक तुझे खूप खूप आभार', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. तिच्या या फोटोवर कमेंट करत हृतिकने लिहिलं, ‘लव्ह इट'. 
 
त्यासोबत 100 ही इमोजी त्याने पोस्ट केली आहे. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकत्र येतील, अशी चर्चा नेटकर्यांनी सुरू केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर