Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झी 5 सादर करत आहे ‘झी 5 सुपर फॅमिली लीग’

ZEE5 Super Family League Launch
, सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (17:28 IST)
अभिनेत्री पूर्वा गोखले, श्रद्धा आर्या, रुही चतुर्वेदी, कनिका मान, आणि कृष्णा कौल झी5 सुपर फॅमिली लीगबद्दल बोलण्यासाठी आले एकत्र.
 
व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत कुमकुम भाग्यचे शब्बीर अहलुवालिया आणि श्रीती झा यांची राहिली विशेष उपस्थिती अलीकडेच, झी5 ने झी5 सुपर फॅमिली लीग सुरू केली असून ही एक अशी गेमिंग लीग आहे ज्यामध्ये दर्शक सहभागी होऊ शकतील, त्यांच्या पसंतीच्या प्राइम टाइम मालिकेमधून कलाकार निवडून दर्शक स्वतःचे संघ तयार करू शकतील. त्यांनी निवडलेल्या टीममधील सदस्यांच्या मालिकेतील वर्तनावरून दर्शकांना गुण मिळतील आणि सर्वाधिक गुण मिळणाऱ्या दर्शकांना स्मार्टफोन, टीव्ही आणि कारसारखे भव्य बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल.
 
झी5 सुपर फैमिली लीगने सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून  आहे आणि झी5 ने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अभिनेत्री पूर्वा गोखले रुही चतुर्वेदी, श्रद्धा आर्या, कनिका मान आणि कृष्णा कौल यांचा समावेश होता. हे एक अतिशय मजेदार संवाद सत्र झाले.
 
झी5 सुपर फैमिली लीगबद्दल बोलताना अभिनेत्री पूर्वा गोखले म्हणाली की, "बर्‍याच वेळा आपल्याला एका मालिकेतील एखादे पात्र आवडते आणि ते दुसऱ्या मालिकेत किंवा कुटुंबात पाहण्याची आपली इच्छा असते. आता, झी5 सुपर फैमिली लीगच्या माध्यमातून दर्शकांना त्यांच्या आवडीची पात्रे एकत्रित करण्याची संधी मिळणार असून बक्षिसे जिंकण्याची संधी देखील मिळणार आहे.
 
अभिनेत्री कनिका म्हणाली की, "सर्व चाहते इथल्या पात्रांसोबत कसे जुळले आहेत हे पाहताना मजा येते आहे आणि झी 5 सुपर फॅमिली लीग प्रत्येकासाठी त्यांच्या आवडत्या पात्रांसह धमाल करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अलाया एफने आपला वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला, तिचा हॉट बिकिनी फोटो चाहत्यांसह शेअर केले