Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या झिरोचा पहिला दिवस कसा राहिला, जाणून घ्या!

bollywood news
21 डिसेंबर रोजी, या वर्षाच्या सर्वात मोठ्या बॉलीवूड चित्रपटांपैकी एक, 'झिरो' रिलीज झाला. या चित्रपटात शाहरुख खान, कॅटरीना कैफ आणि अनुष्का शर्मा सारखे सितारे आहे, त्यामुळे या चित्रपटातून बॉलीवूडला खूप अपेक्षा होत्या. 
 
ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडले होते आणि गाणे देखील अत्यंत आवडले होते. हा प्रतिसाद एक चांगल्या बॉक्स ऑफिस ओपनिंगकडे इशारा करत होता. 
 
मात्र झिरोचे शो सकाळपासून मल्टिप्लेक्समध्ये सुरू झाले, तरी ते हाऊसफुल राहिले नाही. दुसरीकडे, एक स्क्रीन असलेल्या सिनेमाघरातील दर्शकांची संख्या मल्टिप्लेक्ससारखी नव्हती आणि येथे ओपनिंग सरासरी राहिली. 
 
बहुतेक चित्रपट समीक्षकांना चित्रपट आवडला नाही. पहिल्या दिवस 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त कलेक्शन अपेक्षित होता पण ते फक्त 20.14 कोटी राहिले. चित्रपटाच्या बजेटनुसार ओपनिंग निराशाजनक ठरली. तथापि, अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा पुणेरी बायका पोहचल्या ताजमहाल बघायला