Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

Webdunia
गुरूवार, 23 एप्रिल 2020 (14:25 IST)
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत (पी डी एफ फॉर्मेट) काढली. दर्जेदार साहित्य पुरवणारी पत्रिका श्रीसर्वोत्तमचे वाचक संपूर्ण भारतात आणि विदेशात ही असून त्यांना नियमित रूपाने कोरिअर द्वारे अंकाची वाटप करण्यात येते. सध्या लॉकडाऊन मुळे अंकाची हार्ड कॉपी पोहचवणे शक्य नसल्याने वाचकांना कुठलीही असुविधा होवू नये म्हणून संपादक मंडळाने अंकाची पीडीएफ काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्व सदस्यांना एक व्हाट्सअॅप लिंक देऊन समूहात आमंत्रित केले आणि ठरलेल्या दिवशी प्रत जाहीर करण्यात आली. सर्व सदस्यांनी श्री सर्वोत्तमच्या ह्या निर्णयाला भरभरून प्रतिसाद दिला आणि कोरोनाच्या कठिण प्रसंगी श्री सर्वोत्तमने घेतलेला हा निर्णय रचनात्मक आणि योग्य असण्याचे सांगितले.
 
परदेशात असणाऱ्या डॉ अरुणा नारळीकर ह्यांच्या शब्दांत, "श्री सर्वोत्तमच्या पी डी एफ अंकाकरता हार्दिक धन्यवाद. परदेशी असलेल्या मराठी वाचकांना हा अंक विशेष आहे. पुढचे सर्व अंक पण असेच मिळत राहतील तर मायबोली आणी मातृभूमी जवळच आहेत असा विश्वास वाटेल. "
प्रसिद्ध साहित्यिक डॉ वसुधा गाडगीळ ह्यांच्या मते," श्री सर्वोत्तम... उत्तम अंक ! येवढ्या विषम परिस्थितही वाचकांसमोर पीडीएफ रूपात सुंदर अंक आणला हे अतिशय कौतुकास्पद आहे. श्री सर्वोत्तम टीमचे हार्दिक अभिनंदन! "
सर्व वाचक श्री सर्वोत्तमच्या अंकाची आतुरतेने वाट बघत होते. त्यांना हा अंक वेळेवर वाचायला मिळाला म्हणून त्यांनी श्री सर्वोत्तमच्या टीमचे भरभरून कौतुक केले.
श्री सर्वोत्तमचा हा अंक ललित लेख, व्यक्तिचित्र, भटकंती, खाद्यसंस्कृती, कथा, काव्य मंजूषा आणि इतर विविध रुचकर साहित्याने नटलेला आहे. 
 
प्रधान संपादक श्री अश्विन खरे ह्यांनी "ह्या अंकाची हार्ड कॉपी पुढील अंकासोबत देण्यात येईल" असा संदेश आपल्या वाचकांना देऊन वाचकांचे सहयोग आणि प्रेम नेहमी लाभेल ह्या खात्रीसह त्यांच्या सकारात्मक प्रतिसादासाठी आभार व्यक्त केला आहे.
 
रिपोर्ट: ऋचा दीपक कर्पे
सोशल मीडिया मॅनेजर
श्रीसर्वोत्तम

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Summer Special लिंबू पुदिना सरबत

Anniversary Wishes For Parents in Marathi आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

English Language Day 2025:जागतिक इंग्रजी भाषा दिन का साजरा केला जातो जाणून घ्या

Kairi Chutney उन्हाळ्यात बनवा कैरीची चटणी रेसिपी

उन्हाळ्यात चिंच फायदेशीर आहे, त्याचे इतर 9 फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments