7 ते 7.5 टक्के जीडीपीचा अंदाज
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सोमवारी संसदेत सादर केला. भविष्यात देशातील जनतेला महागाईचे चटके बसतील, अशी शक्यता या सर्वेक्षण अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच 2018-19 या आर्थिक वर्षात विकासदर 7 ते 7.5 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सूत्रांनुसार, चालू आर्थिक वर्षात विकासदर 6.5 टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
'डोन्ट वरी, बी हॅपी'
आर्थिक सर्व्हे 2018 सादर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी तिरकस प्रतिक्रिया देताना टि्वटवर म्हटले की, 'डोन्ट वरी, बी हॅपी', उद्योग, कृषी, सकल देशांतर्गत उत्पादनात तसेच रोजगारात दाखविण्यात आलेली वाढ प्रत्यक्षात घसरण असल्याचा दावा त्यांनी केला.
आर्थिक सर्वेक्षण अहवालातील ठळक बाबी
* 2018-19 मध्ये आर्थिक विकासदर 7 ते 7.5 टक्के राहील.
* चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकासदर 6.75 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज
* जीएसटीमुळे अप्रत्यक्ष कर भरणार्यांच्या संख्येत 50 टक्क्यांची वाढ
* कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती ही चिंताजनक बाब
* कच्च्या तेलाच्या दरात 12 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता
* खासगी गुंतवणुकीत सुधारणा होण्याचे संकेत
* निर्यातीत लक्षणीय सुधारणा होणार
* चालू आर्थिक वर्षात कृषी विकासदर 2.1 टक्के राहण्याचा अंदाज
* 2017-18 या आर्थिक वर्षात 3.2 टक्के वित्तीय तुटीचा अंदाज