Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल संसदेत पोहोचले

केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल संसदेत पोहोचले
, शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (10:26 IST)
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अनुपस्थितीमुळे पियूष गोयल सकाळी ११ वाजता अंतरिम अर्थसंकल्प मांडायला सुरुवात करतील. या अगोदर सद्य अर्थ मंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. 

- केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, रवीशंकर प्रसाद संसदेत दाखल

- केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी

अंतरिम बजेटच्या आधी शेअर बाजारात तेजी, सेंसेक्स 106 अंकांनी वधारला
 
नवी दिल्ली: केंद्र सरकार सीसीटीव्ही कॅमेरे आणि वायफायसारख्या सुविधा पुरवण्यासाठी रेल्वेमधली गुंतवणूक वाढवेल, त्याचा रेल्वेला मोठा फायदा होईल- मनोज सिन्हा, रेल्वे राज्यमंत्री
 
केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल संसद परिसरात पोहोचले...
 
अंतरिम अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेच्या आवारात आणल्या आहेत.
 
शेतकरी वर्गाची नाराजी लक्षात घेता सरकारकडून अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी विशेष पावले उचलली जातील. या सगळ्यासाठी ७० हजार ते १ लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. तेलंगणातील रायतू बंधू, मध्य प्रदेशमधील भावांतर आणि ओदिशातील कालिया या योजनांवर आधारित घोषणांची शक्यता आहे.
 
सामान्य नोकरदारांना खूश करण्यासाठी सरकारकडून प्राप्तीकराच्या मर्यादेत वाढ केली जाऊ शकते. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांवरून ३ लाखांवर नेली जाण्याची शक्यता आहे. महिलांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ३.२५ लाखांवर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ३.५ लाखांवर नेली जाण्याची शक्यता आहे. करमुक्त उत्पन्न मर्यादा न वाढवल्यास प्रमाणित वजावटीची मर्यादा १.५ लाखांवरून २ लाखांवर नेली जाण्याचीही शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेत जोरदार बर्फवृष्टी