Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

योगामध्ये करिअर बनवून चांगले योगा शिक्षक बना

योगामध्ये करिअर बनवून चांगले योगा शिक्षक बना
, शुक्रवार, 25 जून 2021 (17:07 IST)
प्रचलित वैद्यकीय पद्धतीच्या तोट्यांमुळे,लोकांमध्ये आयुर्वेद,निसर्गोपचार वाढत असताना योगाकडे लोकांचा कलही काही वर्षांपासून झपाट्याने वाढत आहे.जर एखाद्या व्यक्तीला योग शिक्षक बनायचे असल्यास तर त्याला योगाचे सर्व आवश्यक ज्ञान असावे.
 
 
या क्षेत्रात बरेच संभाव्य आहेत.योग शिक्षण आणि प्रशिक्षणानंतर आपण आपले स्वत: चे योग वर्ग सुरु करू शकता. या साठी आपल्या कडे चांगली स्वच्छ आणि मोकळी जागा असावी.योगासाठी मोकळी जागा असणे सर्वोत्तम आहे.
 
 
आपण एखाद्या मान्यताप्राप्त संस्थे कडून प्रशिक्षण घेतले असल्यास आपण शाळेत आणि महाविद्यालयात देखील योगा वर्ग घेऊ शकता.चिकित्सक आणि संशोधक म्हणून आपण रोग आणि विकारांवर देखील कार्य करू शकता. योगात बरीच क्षेत्र आहेत.परंतु येथे दोन मुख्य क्षेत्र आहे.1 शिक्षण आणि संशोधन आणि 2 रोगांचा उपचार. 
रोगांवर उपचार म्हणजे शरीर आणि मन दोघांचा उपचार करणे.परंतु हे जाणून घेणं आवश्यक आहे की कोणते आसन आणि प्राणायाम केल्याने कोणता आजार बरा होतो. 
 
या साठी विध्यार्थ्यांसाठी खास वर्ग आयोजित केले जातात.या वर्गात त्यांना विविध आसन आणि योगासंदर्भातील इतर पैलू शिकवले जातात.योगावर अनेक ग्रंथ आहेत.योगावरील त्या ग्रंथांचा अभ्यास करून योगाभ्यासाचे नवीन तंत्र समजून घेतले जाऊ शकते.
 
योगाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.कारण व्यायाम व्यवस्थितरित्या केले नाहीत तर समस्या वाढू शकतात.जर योग्य प्रशिक्षण न घेतल्यावर योगा केले तर ते हानिकारक होऊ शकतं. 
 
रोजगाराची शक्यता -सध्या भारतात 30 पेक्षा जास्त अधिक महाविद्यालयात योग विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात.कोणत्याही क्षेत्राचे पदवीधर योगाशी संबंधित अभ्यासक्रमात सामील होऊ शकतात.
 
पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.किंवा डिप्लोमा स्तरावर एका वर्षाचा कोर्स देखील उपलब्ध आहे.येथे हे देखील माहित असणे आवश्यक आहे की महाविद्यालयाच्या व्यतिरिक्त देशभरात अनेक योग अभ्यास केंद्रे देखील आहेत.
 
 
योग अभ्यासक्रमात पुढील विषयांचा समावेश आहे - शरीरशास्त्र, तत्वज्ञान, ध्यान, व्यायाम आणि योग आणि ध्यान नियम आणि सिद्धांत. 

व्यावहारिक पक्षात योगासन,सूर्य नमस्कार आणि प्राणायाम सारखे आसन दर्शविले जातात.
 
योगाच्या संस्था -
 
* डॉ.भीमराव आंबेडकर विद्यापीठ आग्रा (उ.प्र.)
 
* अमरावती विद्यापीठ,अमरावती (महाराष्ट्र).
 
* गुजरात विद्यापीठ,अहमदाबाद(गुजरात)
 
* गुरुकुल कांगडी विद्यापीठ,हरिद्वार(उत्तरांचल).
 
* मुंबई विद्यापीठ,एम.जी.रोड,फोर्ट, मुंबई (महाराष्ट्र).
 
* अंत प्रज्ञा,ईस्ट ऑफ कैलाश,नवी दिल्ली (नवी दिल्ली).
 
* देवी अहिल्या विश्वविद्यालय इंदूर (मध्य प्रदेश)
 
या ठिकाणी योग शाळेचे आयोजन केले जाते -
 
* हिमाचल प्रदेश विद्यापीठ,शिमला (हिमाचल प्रदेश).
 
* डॉ. हरिसिंग गौड विद्यापीठ,गौड नगर,सागर (मध्य प्रदेश).
 
* शिवाजी विद्यापीठ, विद्यानगर,कोल्हापूर (महाराष्ट्र).
 
* श्री वेंकटेश्वर विद्यापीठ, तिरुपती (आंध्र प्रदेश).
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोष्ट : ज्याची काठी त्याची म्हैस