Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बीएड सीईटी ईएलसीटी या परीक्षांचा निकाल जाहीर

बीएड सीईटी ईएलसीटी या परीक्षांचा निकाल जाहीर
, बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (08:36 IST)
महाराष्ट्रात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बी.एड प्रवेशासाठी ही परीक्षा 6 आणि 7 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर झाला. बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘सीईटी’ (CET) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बी.एड सामान्य आणि विशेष (General and Special), त्याचबरोबर बीएड सीईटी ईएलसीटी या परीक्षांचा निकाल जाहीर केला गेला आहे.
 
बी.एड (जनरल ॲण्ड स्पेशल) सीईटी परीक्षेसाठी 52 हजार 213 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 45 हजार 132 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. परीक्षा दिलेले सर्वाच्या सर्व अर्थात 45 हजार 132 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच हे उमेदवार प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, बी.एड प्रवेशासाठी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी केलेल्या अर्जदारांच्या मेरिटनुसार उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. या परीक्षेसाठी 23 हजार 386 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 19 हजार 999 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यातील 19 हजार 997 उमेदवार पात्र ठरले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बटाट्यामधील गोडावा दूर करण्यासाठी सोपे उपाय