तब्बल पाच हजार वर्ष जुन्या योग याला आंतरराष्ट्रीय मान्यता भारताने मिळवून दिली. दर वर्षी 21 जून रोजी संपूर्ण भारतात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या योग शिक्षक म्हणून ट्रेंड चालत आहे. लोक या मध्ये आपले करियर बनवत आहे. जर आपण देखील उज्ज्वल भविष्याच्या शोधात असाल तर योगामधील करियर आपल्यासाठी उत्कृष्ट ठरेल. चला जाणून घेऊ या योगा मध्ये करियर कशे बनवायचे.
* योगातील व्यवसाय वाढतच आहे
आज जगभरातील 1 दशलक्षांहून अधिक योग स्टुडियो आणि तब्बल 20 लाखांपेक्षा अधिक योगा प्रशिक्षक, या मधील सुमारे 85 हजार तर केवळ अमेरिकेतच आहे. हे दर्शवितात की योग आता जगभरात एक चांगले जीवन जगण्याच्या कलेचे नाव आहे. तर आंतरराष्ट्रीय योग दिवसावर सोशल मीडियाचे जगभरात कौतुक केले जाते. आज योगाचा जागतिक व्यवसाय कित्येक अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचला आहे. एकंदरीत बघितले तर योग हा जागतिक निरोगी उद्योगाचा प्रमुख भाग बनला आहे. आजच्या तारखेतच जगातील कदाचित कोणी असे असेल ज्याला योगा बद्दल माहिती नाही.
भारतात योग उद्योगाला बघितल्यावर आढळून आले की हे आता 499 अब्ज रुपयांचा उलाढालीवर गेले आहेत. तसेच डिजिटल योगा उद्योगाने देखील तब्बल 100 अब्ज रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आजच्या काळात फक्त तंदुरुस्त राहणे हे इच्छा किंवा फॅशनच्या भाग नाही तर तंदुरुस्त राहणे जीवन शैलीची अनिवार्य स्थिती बनली आहे. आज भले मोठे उद्योगपती, बॉलिवूड आणि हॉलिवूडचे मोठे कलाकार, मोठे व्यापारी आणि राजकारणातील नेते आपल्या तणाव आणि नैराश्याला कमी करण्यासाठी योगाचा अवलंब करतात.
* महत्त्व समजत आहे-
योग हा लोकांना केवळ शारीरिक दृष्टया निरोगीच ठेवत नाही तर मानसिक दृष्टया देखील निरोगी ठेवतं. आपण व्यायाम किंवा एरोबिक जेवण्यानंतर करू शकतं नाही. पण योगात असे काही आसने आहेत जे अन्नाचे पचन करण्यास मदत करतात. योगात अनेक प्रकारची आसने केले जातात. प्रत्येक आसनांचे आपापले महत्त्व आहे. आसन केल्याने आपण निरोगी होऊ शकता, आपल्या आहारावर नियंत्रण ठेवू शकता आणि आपल्या शरीराचा बांधा उत्तम प्रकारे राखू शकता.
* अश्या प्रकारे मिळणार प्रवेश-
जिथे योगाच्या विशाल उद्योगाचा भाग बनायचं प्रश्न आहे, तर आपण 12 वी उत्तीर्ण केल्यावर देखील या क्षेत्रात पाउले टाकण्यासाठी डिप्लोमा करू शकतात. नंतर सराव सुरू ठेवायचा. आपण इच्छित असल्यास या मध्ये उच्च शिक्षण देखील घेऊ शकता आणि आपली पात्रता वाढवू शकता.
* कामाची संधी-
या कामाची सुरुवात आपण आपल्या घरापासून देखील करू शकता. आपले ग्राहक तयार करा. या कामात घाई करून चालत नाही. आपण आपले ग्राहक ठरवून त्यांचा घरी जाऊन त्यांना योगा करवू शकता.
सहसा या कामाची मागणी शाळेत, रुग्णालयात आणि कार्पोरेट हाउस मध्ये असते. कोणी ही योग शिकवणारी व्यक्ती शाळेत शिक्षक/शिक्षिका म्हणून काम करू शकते. त्याच प्रमाणे, अशे रुग्णालय जिथे सर्व प्रकारचे थेरेपी सेंटर आहेत तेथे आपल्याला इन्स्ट्रक्टर किंवा प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळू शकेल.
* उत्पन्न-
तसं तर योग प्रशिक्षकाला सरकारी आणि खासगी संस्थेमध्ये वैध वेतन दिले जाते, पण आपण ज्यावेळी स्वतंत्र पणे योग प्रशिक्षक म्हणून काम करता तर आपली फीस आधीपासून निश्चित केली जात नाही ती आपण आपल्या ग्राहकाच्या खरेदीच्या सामर्थ्यावर आणि आपल्या क्षेत्राच्या आधारे ठरवू शकता.
* प्रमुख संस्था-
एमडीएन आयवाय, नवी दिल्ली
बर्कतुल्ला विद्यापीठ, भोपाळ
पीआरएसयू, रायपुर
कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र