Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Career Tips करिअर सुधारण्यासाठी या सोप्या टिप्सचे अनुसरण करा

Webdunia
गुरूवार, 7 जुलै 2022 (08:00 IST)
प्रत्येक व्यक्तीला जीवनात यश मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कठोर परिश्रम करतो. पण प्रत्येकालाच करिअरमध्ये यश मिळत नाही. अशा वेळी माणसाला असे वाटते की, यशस्वी लोक असे काय करतात किंवा त्यांच्यात अशी कोणती वैशिष्टय आहे, ज्यामुळे त्यांना प्रगतीच मिळते. तुम्हीही असाच विचार करत असाल, तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. करिअर चांगलं करणं खरंच तितकं अवघड नाही. तुम्हाला फक्त काही छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचे करिअर सुधारण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे-
 
1 लहान ध्येय बनवा-
करिअर चांगलं करायचं असेल तर मोठ्या ध्येयांपूर्वी छोट्या यशावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. दोन वर्षांनी किंवा पाच वर्षांनंतर आपण स्वत:ला कुठे पाहता याचा नुसता विचार करणे पुरेसे नाही. त्यापेक्षा त्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग आजपासूनच ठरवायचा आहे. मोठे यश मिळविण्यासाठी, त्यास लहान भागांमध्ये विभाजित करा. उदाहरणार्थ,  करिअरमध्ये कोणते स्थान मिळवायचे आहे,आपल्यात कोणती गुणवत्ता असली पाहिजे आणि कौशल्य सुधारण्यासाठी आपण काय करता, हे देखील खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे दररोज काही लहान ध्येये ठेवा. असं केल्याने आपोआप मोठे यश मिळेल.
 
2 स्मार्ट काम-
आजच्या काळात फक्त मेहनत करणे पुरेसे नाही तर स्मार्ट वर्क करायला शिकणे देखील आवश्यक आहे. आपण कष्ट केले, पण त्याची दखल कोणी घेतली नाही किंवा त्याचे श्रेय दुसऱ्याने घेतले, तर या मुळे आपले  करिअर कधीही सुधारू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच ते वरिष्ठांच्या नजरेत यावे याकडेही लक्ष द्यावे. आपल्याला हवे असल्यास केलेले काम सोशल मीडियावर पोस्ट करा आणि वरिष्ठांकडून फीडबॅक घ्या. अशा प्रकारे आपण केलेले काम इतरांच्या दृष्टीस येईल आणि या मुळे  यशाची शक्यता वाढेल.
 
3 नेटवर्क तयार करा-
सध्या करिअरमध्ये सुधारणा करण्यासाठी नेटवर्कही खूप उपयुक्त आहे. जेव्हा आपण आपल्या क्षेत्रातील लोकांशी जोडले असता आणि त्यांच्याशी आपले चांगले संबंध असतात, तेव्हा आपल्या कडून कोणतीही संधी सोडली जात नाही. कदाचित आपल्याला फक्त इंटरनेट किंवा इतर माध्यमांद्वारे नोकरीबद्दल माहिती मिळेल, परंतु जेव्हा त्या कंपनीत काम करणारी एखादी व्यक्ती आपल्याला ओळखते, तेव्हा आपल्याला कंपनीचे धोरण आणि तेथील वातावरण याबद्दल देखील माहिती मिळते, जेणेकरून आपल्यासाठी निर्णय घेणे सोपे होते. की या ठिकाणी काम करणे आपल्यासाठी योग्य आहे की नाही. उत्तम नेटवर्क एक नाही तर अनेक मार्गांनी करिअर सुधारण्यास मदत करते.
 
4 कार्यालयीन शिष्टाचार-
सामान्यतः लोकांना असे वाटते की चांगले काम करूनच यश मिळू शकते, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. कामाच्या दर्जासोबतच इतरही अनेक गोष्टी ऑफिसमध्ये लक्षात येतात. जसे की  सहकाऱ्यांसोबतचे संबंध कसे आहेत. ऑफिसला वेळेवर आलात की नाही, आपल्याला  डेडलाईनवर काम करण्याची सवय आहे की नाही, याशिवाय ऑफिसमधील बॉस आणि सीनियर्सही आपल्या बॉडी लॅंग्वेज  आणि इतर अनेक गोष्टींकडे लक्ष देतात. म्हणून, आपले करियर सुधारण्यासाठी, आपण प्रत्येक लहान गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

ब्लॅक कॉफी चे आरोग्यासाठी फायदेशीर आणि तोटे जाणून घ्या

हिवाळ्यात कोरड्या त्वचेची, घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काळजी घ्या

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

योगाच्या या 5 टिप्सचा अवलंब केल्यास नेहमी निरोगी राहाल

पुढील लेख
Show comments