Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

JEE Main Exam Preparation Tips:जेईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी टिप्स आणि युक्त्या जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 31 मे 2022 (15:44 IST)
JEE Main Exam Preparation Tips देशभरातील विद्यापीठांमध्ये आयोजित अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रतिष्ठित प्रवेश परीक्षा, या वर्षी दोन टप्प्यात आयोजित केली जात आहे. परीक्षेच्या पहिल्या टप्प्याच्या म्हणजेच जून सत्राच्या परीक्षेच्या तारखा आता जवळ आल्या आहेत. तर पुढील टप्प्यातील मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. 
 
जेईई मुख्य परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे सीबीटी मोडमध्ये घेतली जात आहे. JEE Main द्वारे, 31 एनआयटी(NIT), 25 आयआयटी (IIT), 28 जीएफटीआय (GFTI) आणि इतर विद्यापीठांचे अभियांत्रिकी अभ्यासक्रम दिले जातात. यासह, आयआयटी(IIT)मध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई अॅडव्हान्स्डची पात्रता परीक्षा देखील आहे. 
 
JEE Mains साठी अभ्यास - 
JEE मेन परीक्षा 2022 उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना एनसीईआरटीची इयत्ता 11 आणि 12 विषय - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये पारंगत असणे आवश्यक आहे. दोन्ही JEE प्रवेश परीक्षेच्या सामान्य तयारीसाठी उमेदवारांनी इयत्ता 11वी आणि 12वी मधील प्रत्येक विषय वेग -वेगळे करणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे, जेईई मेन अभ्यासक्रमाचे विषय सोपे, अवघड आणि अतिशय कठीण असे विभागले जावेत जेणेकरून त्यानुसार तयारी करता येईल. 
 
जेईई मेन 2022 तयारी योजना -
जेईई मेन 2022 तयारी योजना कशी तयार करावी हा सर्वात मोठा प्रश्न विचारला जातो. सर्व विषय तितकेच महत्त्वाचे आहेत, तथापि, काही विषयांना अधिक महत्त्व आहे. विषय वेगळे केल्यानंतर, त्यांचे वेटेज जाणून घेणे महत्वाचे आहे. साधारणपणे, प्रश्न अधिक वेटेज असलेल्या भागातून अधिक विचारले जातात.
 
उत्तम नियोजनासाठी आणि विषयांचे वेटेज समजून घेण्यासाठी टॉपर्सच्या मुलाखती आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका तपासा. नियमित अभ्यास करण्यासाठी आवश्यक दिनचर्या आणि वेळापत्रक तयार करा आणि त्याचे अनुसरण करा. कठीण विषयांना जास्त वेळ द्या आणि ज्या विषयांची तुम्हाला फक्त उजळणी करायची आहे त्यांना कमी वेळ द्या.
 
जेईई मेन जेईई मेन 2022 तयारीचे टप्पे
* सर्वप्रथम जेईई मेन 2022 चा अभ्यासक्रम जाणून घ्या.
* जेईई मेन 2022 च्या परीक्षेचा पेटर्न समजून घ्या.
* काठीण्य पातळीनुसार जेईई मेन अभ्यासक्रमाची विभागणी करा.
* इयत्ता 11वी आणि 12वीचा अभ्यासक्रम वेगळा करा.
* विषय समजत नाहीत, शिकावे लागणार, कमकुवत विषय आणि चांगले विषय अशी विभागणी करावी.
* परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार आणि गुणांचे वेटेजनुसार विषय वेगळे करा  .
* अधिक मार्कांच्या वेटेजच्या आधारे विषयाची तयारी करा.
* स्वतःसाठी साप्ताहिक आणि दैनंदिन वेळापत्रक तयार करा. 
* ज्या विषयांवर पुन्हा काम करणे आवश्यक आहे त्यांची यादी तयार करा. 
* अधिक प्रोडक्टीव्ह होण्यासाठी, लहान, हस्तलिखित नोट्स बनवा
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

चेहऱ्यावरील मुरुम काढण्यासाठी लसणाचा वापर

वजन कमी करण्याचे 5 गुपित जाणून घ्या

योगा करताना या चुका अजिबात करू नका, नुकसान संभवते

Pu La Deshpande Birthday :पु. ल. देशपांडे ह्यांची कविता मी एकदा आळीत गेलो

पंचतंत्र : शेळ्या आणि कोल्ह्याची गोष्ट

पुढील लेख
Show comments