Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

FYJC 11th Admission : अकरावी प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (09:36 IST)
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ. 11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत.
 
सदर 5 ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलग्न आहे. वरील पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.
 
अशी असेल ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया :
14 ते 22 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्ज भाग - 1 भरता येईल.
विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाची पडताळणी करण्यासाठी जवळच्या कॉलेज किंवा मार्गदर्शक केंद्रावर जाता येईल.
17 ऑगस्ट सकळी 10 वाजल्यापासून ते 22 ऑगस्ट रात्री 11 पर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरता येईल.
यात विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी पसंती प्राधान्यानुसार द्यायची आहेत.
विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागांची माहिती देण्यात येईल.
23 ऑगस्ट सकाळी 10 ते 24 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वसाधरण गुणवत्ता यादी ( मेरीट लीस्ट) जाहीर होणार.
प्रवेश अर्जात काही बदल करायचे असल्यास संधी दिली जाणार आहे.
27 ऑगस्ट सकळी 10 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार
पहिल्या यादीनंतर कॉलेजचे कट ऑफ संकेतस्थळवर जाहीर होणार.
27 ऑगस्ट सकाळी 10 ते 30 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्याला प्रवेश मिळालेले कॉलेज निश्चित करायचे आहे.
30 ऑगस्ट रात्री 10 वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.
मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ. 11वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते.
 
न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा दिनांक 14 ऑगस्ट 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.
 
ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असं शिक्षण विभागाने म्हटलं आहे.
 
प्रवेशाकरिता https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन मोबाईल अॅप डाऊनलोड करता येऊ शकेल. तसंच अधिक माहितीसाठी doecentralize11state@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

मसालेदार भरली वांगी रेसिपी

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

तुम्हालाही आहे का किडनी स्टोनची समस्या चुकूनही हे पदार्थ खाऊ नका

Career in PGDM Business Analytics : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन बिझनेस अॅनालिटिक्स

पुढील लेख
Show comments