Medical Courses without NEET: दरवर्षी लाखो विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी NEET परीक्षा देतात. तुम्हाला माहिती आहे का की NEET शिवायही वैद्यकीय क्षेत्रात करिअर करता येते. येथे आम्ही असे काही पर्याय सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही NEET शिवाय चांगली नोकरी मिळवू शकता आणि लाखोंमध्ये पगार मिळवू शकता.
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक नाही. NEET परीक्षा उत्तीर्ण न होताही तुम्हीवैद्यकीय क्षेत्रात चांगले करिअर करू शकता.
जर तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा गणित (PCB/PCM) विषयांसह इंटरमिजिएट 12वी पास असाल तर तुम्ही NEET परीक्षेशिवाय अनेक वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये तुमचे करिअर करू शकता. कसे काय चला जाणून घ्या.
1. बीएससी नर्सिंग
बीएससी नर्सिंग हा चार वर्षांचा पदवी स्तरावरील अभ्यासक्रम आहे, त्यानंतर उमेदवार स्टाफ नर्स, रजिस्टर नर्स (आरएन), नर्स टीचर, मेडिकल कोडर यासारख्या पदांसाठी अर्ज करू शकतात. नर्सिंगसाठी एनईईटी अनिवार्य नसली तरी आता अनेक राज्यांमध्ये बीएससी नर्सिंगचे प्रवेश एनईईटी स्कोअरद्वारे केले जात आहेत. या कोर्सनंतर, उमेदवारांना वार्षिक 3 लाख ते 8 लाख रुपये पगार मिळू शकतो.
2. B.Sc. न्यूट्रिशन आणि डायटेशियन / ह्युमन न्यूट्रिशन / फूड टेक्नॉलॉजी
हा अभ्यासक्रम तीन ते चार वर्षात करता येतो. हे पूर्ण केल्यानंतर, एखाद्याला न्यूट्रिनिस्ट, फूड टेक्नॉलॉजिस्ट आणि रिसर्चच्या पदांवर नोकरी मिळू शकते. जिथे तुम्हाला वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.
3. B.Sc. बायोटेक्नॉलॉजी
12 वी नंतर, जर तुम्हाला NEET उत्तीर्ण न करता वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर B.Sc. बायोटेक्नॉलॉजी हा एक चांगला पर्याय.आहे हा अभ्यासक्रम तीन ते चार वर्षांत पूर्ण होतो. हा कोर्स केल्यानंतर बायोटेक्नॉलॉजिस्टच्या पदावर नोकरी मिळू शकते, जिथे वार्षिक पॅकेज 5 लाख ते 9 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
4. बीएससी अॅग्रीकल्चर सायन्स
बीएससी अॅग्रीकल्चर हा 4 वर्षांचा अंडरग्रेजुएट बॅचलर डिग्री कोर्स आहे. अनेक महाविद्यालये या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षाही घेतात. कोणत्याही सरकारी महाविद्यालय आणि विद्यापीठातून B.Sc अॅग्रीकल्चर करायचे असेल तर तुम्हाला वार्षिक 7 हजार ते 15 हजार रुपये शुल्क जमा करावे लागेल. या कोर्सनंतर तुम्ही अॅग्रोनॉमिस्ट, अॅग्रीकल्चर सायंटिस्ट आणि अॅग्रीबिझनेस अशा पदांवर काम करू शकता. या कोर्सनंतर तुम्ही दरवर्षी 5 लाख ते 9 लाख रुपये कमवू शकता.