इंजिनीअरिंग यूजी प्रवेश परीक्षा JEE Main २०२१ च्या नावे एक बोगस वेबसाइट सुरू आहे. यावर जेईई मेन २०२१ साठी ऑनलाइन अर्ज मागवून शुल्क आकारले जात आहे. या प्रकाराबद्दल NTA ने सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
NTA एक परिपत्रक जारी करत म्हटले आहे की एक वेबसाइटबद्दल खूप तक्रारी आल्या असून ही साइट बनावट असल्याचे सांगितले जात आहे. ही वेबसाइट बोगस असून jee guide नावाने सुरु आहे.
यावर ई-मेल आयडी आणि हेल्पडेस्क नंबरही जारी केला आहे. एनटीएने या वेबसाइटचे डिटेल्स जारी केले आहेत. बोगस वेबसाइटचा अॅड्रेस jeeguide.co.in
असून ईमेल आयडी info@jeeguide.co.in असं देण्यात आलं आहे. त्यावर ९३११२४५३०७ मोबाइल क्रमांक जारी केलेला आहे.
अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in आहे म्हणून विद्यार्थ्यांनी चुकूनही बोगस वेबसाइटवर विश्वास ठेवू नये. तसेच साईटच्या बनावट मेल आयटी किंवा मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न करू नये.