Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

Webdunia
शुक्रवार, 12 मे 2023 (07:36 IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२३ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे व दिनांक २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी मुंबई जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ०९ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.
 
परिक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मानेदेशमुख अनिकेत सिद्धेश्वर हे राज्यातून प्रथम आले आहेत. सांगली जिल्ह्यातील साळुंखे अभिजीत अशोक हे मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीमती कुपटे अक्षता महादेव ह्या प्रथम आल्या आहेत.
 
उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
 
अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज  करावेत, असे आयोगाने कळविले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

तुम्हालाही आहे का किडनी स्टोनची समस्या चुकूनही हे पदार्थ खाऊ नका

Career in PGDM Business Analytics : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन बिझनेस अॅनालिटिक्स

एलोवेरा जेलमध्ये कधीही मिसळू नये या 3 गोष्टी, त्वचेसाठी फायद्याऐवजी नुकसानदायक

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

पुढील लेख
Show comments