Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL हून डिसक्वॉलिफाई प्रवीण तांबे आता CPL मध्ये शाहरुख खानच्या संघात खेळण्यासाठी सज्ज

Webdunia
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (09:04 IST)
भारताचे अनुभवी लेग स्पिनर प्रवीण तांबे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून खेळण्यासाठी तयार असताना त्यांना यात खेळण्याची परवानगी मिळाली नाही कारण ते अबु धाबीमध्ये एका अमान्य टी10 लीगमध्ये खेळले होते. 
 
बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडू केवळ आयपीएलमध्ये खेळू शकता किंवा इतर देशांच्या लीगमध्ये. त्याप्रमाणे तांबे 2018 मधील टी 10 लीगमध्ये सामील झाले असताना बीसीसीआयने त्यांना आयपीएल खेळण्यावर नकार दिले होते. आयपीएलहून डिस्क्वॉलिफाइड झाल्यावर आता तांबे कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची तयारी करत आहेत.
 
48 वर्षीय प्रवीण तांबेला आयपीएल 2020 ऑक्शनमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने त्यांच्या आधार मूल्य 20 लाख रुपयात खरेदी केले होते. आता तांबे केकेआरच्या सिस्टर फ्रेंचाइजी त्रिनबागो नाइट रायडर्समध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल 2020) मध्ये खेळण्यास सज्ज आहे. 
 
प्रवीण तांबेने एका मुलाखतीत म्हटले की ''मी फिट आहे आणि बीसीसीआयने परवानगी दिली नसली तरी मी इतर लीगमध्ये भाग घेऊ शकतो. मी बाहेर खेळण्यास योग्य आहे आणि त्रिनबागो नाइट रायडर्सने माझी निवड केली आहे. मी तिथे जाण्यापूर्वी सर्व आवश्यक खबरदारी घेणार आणि प्रोटोकॉलचं अनुसरण करेन.''
 
त्याने म्हटले की ''मी आपल्या शारीरिक फिटनेसवर घरीच काम करत आहे अर्थातच मी निश्चित रूपाने या संस्करणाकडे बघत आहे.'' तांबे या दोन भारतीय खेळाडूंपैकी आहे ज्यांनी सीपीएल ड्राफ्टसाठी पंजीकरण करवले होते.

वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये सर्वात वयस्कर डेब्यू करणार्‍या खेळाडूच्या रूपात प्रवीण तांबे चर्चेत आले होते. त्यांचा आयपीएल डेब्यू 2013 साली झाला होता. 2013 ते 2016 च्या चार सीझनमध्ये त्यांनी एकूण 33 आयपीएल सामने खेळत 28 विकेट घेतले.
 
या दरम्यान ते राजस्थान रॉयल्स, गुजरात लॉयन्स आणि सनराइजर्स हैदराबाद संघाचा भाग राहिलेले आहेत. 2016 नंतर आतापर्यंत त्याने कोणतेही आयपीएल सीझन खेळलेले नाही. 2017 साली सनराइजर्स हैदराबाद संघाने त्याला खरेदी केले होते परंतू कोणत्याही सामन्यात त्याला प्लेइंग इलेवनमध्ये संधी मिळाली नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

SRH vs DC : आयपीएल 2025 चा 55 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात राजीव गांधी स्टेडियमवर

PBKS vs LSG: अष्टपैलू कामगिरीमुळे पंजाब जिंकला, किंग्ज दुसऱ्या स्थानावर

KKR vs RR: केकेआरने आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा एका धावेने विजय मिळवला

PBKS vs LSG : आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स दुसऱ्यांदा एकमेकां समोर येणार

KKR vs RR: आयपीएल 2025 मधील 53 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार, प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments