साहित्य : 2 किलो फणस, 100 शेंद मीठ, 100 ग्रॅम मोहरी, 50 ग्रॅम हळद, 100 ग्रॅम शोप, 50 ग्रॅम जिरं, 100 ग्रॅम तिखट व तेल अंदाजे.
कृती : सर्वप्रथम हाताला तेल लावून फणस सोलून घ्यावे व त्याचे तुकडे करावे. त्या तुकड्यांना काही वेळ पाण्यात ठेवावे. नंतर पाण्यातून काढून त्याला 5 मिनिट उकळावे. थंड झाल्यावर सर्व पाणी काढून त्या फोडीना उन्हात 2 तासासाठी वाळवावे. नंतर त्या तुकड्यांना मीठ लावून एका बरणीत भरून 2-3 दिवस उन्हात ठेवावे. व त्यात वर दिलेला मसाला वाटून घेऊन त्यात टाकून एकजीव करावे व बरणीला 2 दिवस पुन्हा ऊन दाखवावे. तिसऱ्या दिवशी त्या मसाल्यात तेल टाकून चांगले हालवून घ्यावे व बरणीत बंद करून 10-12 उन्हात ठेवल्यानंतर हे लोणचे उपयोगात आणावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा