*उष्णतेुळे अंगावर घामोळे येणे, उष्णतेमुळे अंग जळजळणे, हिट रॅशेस यासारख्या कारणांनी मुले बेचैन होतात. म्हणूनच या दिवसांत मुलांना ढगळ, सुती कपडे घालावेत.
* बाह्यांचे कपडे घालावेत. बाहेर पडताना कॅप घालायची झाल्यास इलॅस्टिक नसल्याची खात्री करावी कारण इलॅस्टिकमुळे हवेचा प्रवाह बाधित होतो आणि मुलांच्या डोक्याचे तापमान वाढू शकतं.
* उन्हाळ्यात दर तीन तासांनी मुलांचे डायपर बदलावे. डायपर बदलून योग्य पद्धतीने स्पंजिंग करावे आणि त्वचा कोरडी झाल्यानंतरच दुसरे डायपर लावावे.
* मुलांनाही डिहायड्रेशनचा धोका असतो. मुलांना वरचे अन्न सुरु केले असेल तर आहारात द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवावे. ताज्या फळांचे रस, ताजे ताक, मिल्क शेक, पाणी याचे उत्तम संतुलन साधावे. पातळ खिचडीऐवजी मुलांना थंड पदार्थ द्यावेत.
* शक्यतो तेल मसाज टाळावा. कारण अनवधानाने त्वचेवर तेलाचा थर तसाच राहिल्यास हीट रॅशेस, फोड अथवा खाज सुटण्याची दाट शक्यता असते. विशेषतः मानेचा खालचा भाग, पाठ, खांदे आणि नॅपीच्या जवळच्या भागात तेल राहण्याचा धोका असतो.
* खूप पावडर लावू नये.
* मुलांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच या काळात बाहेर नेऊ नये. थोड्या मोठ्यामुलांना वॉटर स्पोर्टसचा आनंद घेऊ द्यावा. मुले थेट एसीच्या खाली झोपणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
उन्हाळ्यात खिडक्या-दारे उघडी ठेवून घरात मोकळी हवा खेळू द्यावी. ही खबरदारी घेतल्यास मुलांना या उष्णतेचा दाह जाणवणार नाही.