Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राज्यात गेल्या 24 तासात 1,520 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

राज्यात गेल्या 24 तासात 1,520 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
, सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (08:19 IST)
राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची  संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आत आली आहे.  राज्यात रविवारी 1 हजार 410 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 520 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आतापर्यंत 64 लाख 35 लाख 439 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.46 टक्के झाले आहे. तसेच  18 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 016 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
 
सध्या राज्यात 23 हजार 894 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 18 लाख 93 हजार 695 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 02 हजार 961 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 401 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 903 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IndvsPak: भारतीय संघाच्या पाकिस्तानविरुद्ध मानहानीकारक पराभवाची 5 कारणं