राज्यात नव्यानं वाढ होणा-या कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारांवर स्थिरावली आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यात दहा हजार नव्या रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रात (बुधवारी) दिवसभरात 10 हजार 989 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. सध्या राज्यात 1.61 लाख सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यातील आत्तापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 58 लाख 63 हजार 880 इतका झाला आहे. त्यापैकी 55 लाख 97 हजार 304 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 16 हजार 379 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 95.45 टक्के एवढा झाला आहे. आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
राज्यात सध्या 1 लाख 61 हजार 864 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला. आज दिवसभरात महाराष्ट्रात 261 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 1 हजार 833 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.74 टक्के एवढा आहे.
राज्यात आतापर्यंत 3 कोटी 71 लाख 28 हजार 093 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 11 लाख 35 हजार 347 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6 हजार 494 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
पुण्यात सध्या सर्वाधिक 19 हजार 275 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर मुंबईत 17 हजार 939, कोल्हापूर 17 हजार 822, ठाण्यात 16 हजार 076 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.