Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राज्यात 1 लाख 14 हजार सक्रिय रुग्ण, 8418 नवे रुग्ण

राज्यात 1 लाख 14 हजार सक्रिय रुग्ण, 8418 नवे रुग्ण
, बुधवार, 7 जुलै 2021 (09:58 IST)
महाराष्ट्रात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या राज्यात 1 लाख 14 हजार 297 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात मंगळवारी दिवसभरात 8 हजार 418 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली.

आरोग्य विभागाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 लाख 13 हजार 335 एवढी झाली आहे. त्यापैकी 58 लाख 72 हजार 268 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर  10 हजार 548 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात 171 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 23 हजार 531 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.01 टक्के एवढा झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.06 एवढा झाला आहे.
 
राज्यात आतापर्यंत 4 कोटी 29 लाख 08 हजार 288 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 38 हजार 832 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 447 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

त्या’ आरटीओ कार्यालयासमोर चक्क ‘जागरण गोंधळ’ घातला