Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राज्यात २,८८९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात २,८८९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद
, शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (07:40 IST)
राज्यात गुरुवारी २,८८९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०,१८,४१३ झाली आहे. राज्यात गुरुवारी ४३,०४८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,९४४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे.
 
राज्यात गुरुवारी ५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७, नाशिक ६, अहमदनगर ४, पुणे १२, पिंपरी चिंचवड मनपा ३, सातारा ३, नागपूर ४ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी २४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३ मृत्यू पुणे ७, नाशिक ५ आणि ठाणे १ असे आहेत.
 
तर  ३,१८१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,२३,१८७ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२८ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,४४,३०,२२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,१८,४१३ (१३.९९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९७,९४१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले नव्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षाचे नाव