Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 231 मृत्यू, 8,085 नव्या रुग्णांची नोंद

Webdunia
बुधवार, 30 जून 2021 (09:54 IST)
महाराष्ट्रात मंगळवारी 231 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, 8 हजार 085 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 60 लाख 51 हजार 633 एवढी झाली. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 58 लाख 09 हजार 548 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. मंगळवारी  8 हजार 623 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 098 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रात आजवर 1 लाख 21 हजार 804 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. मंगळवारी  231 कोरोना रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.01 टक्के एवढा झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
राज्यात आतापर्यंत 4 कोटी 13 लाख 98 हजार 501 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 21 हजार 377 लोक होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 584 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत, पुण्यात सध्या 16 हजार 467 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल ठाण्यात 15 हजार 935, मुंबई मध्ये 12 हजार 684 सक्रिय रुग्ण आहेत.तसेच, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात दहा हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल व्हॅन दुचाकीला धडकल्याने तरुणाचा मृत्यू

यूएस निवडणूक 2024 निकाल : ट्रम्प आणि कमला हॅरिस या दोघांचा आकडा 200 च्या पार

भाजपचे मदतनीस महाराष्ट्राचे शत्रू- उद्धव ठाकरे

कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

'सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंची तत्त्वे सोडली', शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments