ओमायक्रॉननं राज्याच टेन्शन वाढलंय. राज्यात ओमायक्रॉनचे 26 संशयित रूग्ण सापडले आहेत. यातले 9 संशयित एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळे नव्या व्हेरियंटला रोखण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर आहे. गंभीर बाब म्हणजे यातले 9 संशयित हे एकट्या मुंबईतले आहेत. या सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच त्यांना ओमायक्रॉनची लागण झालीय की नाही? हे स्पष्ट होईल.