suvichar

राज्यात ३,५५८ नवे करोनाबाधित रुग्ण दाखल

Webdunia
सोमवार, 11 जानेवारी 2021 (08:16 IST)
राज्यात रविवारी ३,५५८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २,३०२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.
 
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात  आढळून आलेल्या नव्या ३,५५८ रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या १९,६९,११४ झाली आहे. तर २,३०२ रुग्ण बरे झाल्याने एकूण १८,६३,७०२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ३४ मृतांच्या संख्येमुळे करोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या ५०,०६१वर पोहोचली आहे. तसेच सध्या राज्यात ५४,१७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
दरम्यान, पुणे शहरात दिवसभरात २६४ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे अखेर रुग्णसंख्या १ लाख ८१ हजार ५११ इतकी संख्या झाली आहे. दरम्यान, ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४ हजार ६७९ झाली आहे. २१४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आता पर्यत १ लाख ७४ हजार १४३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

LIVE: गावठी दारूत ‘मिथेनॉल’ मिसळले, मृतांचा आकडा १८ वर

एसीबीने अंबरनाथ भागातील महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

कर्नाटकात जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरार, 6 जणांची हत्या

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, आजचे दर जाणून घ्या

कार भाजीच्या दुकानात धडकून अपघातात महिला व २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments