Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ‘कोरोना’चे 4,797 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Webdunia
सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (08:12 IST)
राज्यात रविवारी  04 हजार 797 नवीन कोरोनाबाधित  रुग्णांची नोंद झाली आहे. तर 03 हजार 710 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61 लाख 89 हजार 933 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.86 टक्के झाला आहे. आज 130 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 35 हजार 039 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 2.11 टक्के इतका झाला आहे.
 
राज्यात सध्या 64 हजार 219 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 09 लाख 59 हजार 730 प्रयोगशाळा चाचण्या  करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 63 लाख 92 हजार 660 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 03 लाख 59 हजार 642 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 2 हजार 453 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
पुणे शहरातील  कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 204 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 244 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 06.
– 204 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 490446.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 2098.
– एकूण मृत्यू – 8847.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 479501.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 8876.
 
पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 113 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 079 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एकही मृत्यू नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 267168.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 952.
– एकूण मृत्यू – 4376.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 267168.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5225.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments