Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात ४ हजार २६८ नवे कोरोना रुग्ण दाखल

4 thousand 268
, शनिवार, 12 डिसेंबर 2020 (09:00 IST)
राज्यात शुक्रवारी  २७७४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील एकूण १७ लाख ४९ हजार ९७३ रुग्णांनी आत्तापर्यंत कोरोनावर मात केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४६ टक्के झाला आहे. राज्यात ४ हजार २६८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर सध्या २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १५ लाख ७० हजार १३७ नमुन्यांपैकी १८ लाख ७२ हजार ४४० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३२ हजार २८८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार १२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या  ७३ हजार ३१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख ७२ हजार ४४० इतकी झाली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शासकीय कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू, मंत्रालयात जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही