Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात बुधवारी 767 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

Webdunia
गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (08:11 IST)
राज्यात बुधवारी 767 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात 903 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 84 हजार 338 रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य  यंत्रणेला यश आले आहे. मात्र नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्क्यांवर स्थिरावला आहे. राज्यात आज 28 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 1 लाख 41 हजार 025 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 07 हजार 391 रुग्ण सक्रीय (Active Patient) आहेत. राज्यात आतापर्यंत 6 कोटी 56 लाख 19 हजार 951 जणांची कोरोना चाचणी (Corona test) करण्यात आली आहे. त्यापैकी 66 लाख 36 हजार 425 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 74 हजार 812 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 923 रुग्ण वैद्यकीय संस्थेत  उपचार घेत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात वारकरी संतांचा मेळा, ७ जून रोजी पालखी सोहळा

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments