Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आदित्य सिंगल आहे का ?

aditya single
, सोमवार, 20 एप्रिल 2020 (10:27 IST)
सध्या संपूर्ण जगासह देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसचं संकट उभं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. भारतात देखील सुरुवातीला 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. आता लॉकडाऊनची मुदत वाढवली असून भारतात लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जण एकजुटीने पुढे आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून कोरोनाचा मुकाबला करत आहेत.
 
कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक देश आपआपल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोक दहशतीखाली आहेत. राज्यातही तीच परिस्थिती असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकांशी संवाद साधत आहेत.
 
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजारावर पोहचली आहे तर 200 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी बोलत आहेत. लोकांनी काय खबरदारी घ्यायला हवी. सरकारचे नियम पाळले जावेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्रीत या संटकाला सामोरे जाण्याचे आवाहन करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे या कामाचे सोशल मीडियातून कौतुकही होत आहे. पण अशा परिस्थितीही काही माणसं नकळत प्रसिद्धीच्या झोकात येऊ पहातात.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी लाईव्ह संवाद साधत होते. त्यावेळी एका मुलीने मी सिंगल आहे, आदित्य सिंगल आहे का ? असा प्रश्न केला. आदित्य ठाकरे आमदार असून ते मंत्री देखील आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव देखील आहेत. त्यामुळे वडील उद्धव ठाकरेंकडे एका मुलीने मुलासाठी मागणी घातल्याचा स्क्रिनशॉट्स सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय. निकीता सोनवणे नावाच्या एका ट्विटर युजरने हे ट्विट केले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पालघर घटनेतील सर्व आरोपींना अटक, दोषींना कडक शिक्षा होईल: उद्धव ठाकरे