Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राज्यात कोरोनाचा मोठा विस्फोट ! एका दिवसांत 8 हजार रुग्ण…ओमिक्रॉनचे किती रुग्ण

राज्यात कोरोनाचा मोठा विस्फोट ! एका दिवसांत 8 हजार रुग्ण…ओमिक्रॉनचे किती रुग्ण
, शनिवार, 1 जानेवारी 2022 (08:20 IST)
अखेर ज्याची भीती होती, तेच घडलं आहे, राज्यात करोना संसर्ग पुन्हा एकादा झपाट्याने वाढू लागला आहे. मुंबई, पुणेसह अन्य प्रमुख शहारांमध्ये दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
 
आज दिवसभरात राज्यात आढळलेल्या नवीन करोनाबाधितांची संख्या ही ८ हजारांच्याही पुढे आहे. त्यामुळे निश्चितच ही चिंताजनक बाब म्हणावी लागणार आहे. आज दिवसभरात राज्यात ८ हजार ६७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.
 
तर, आठ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 8 हजार 67 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
 
तर 1 हजार 766 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे.
 
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 66 लाख 78 हजार 821 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 75 हजार 592 नागरिक होम क्वारंटाईन आहेत.
 
तर 1 हजार 79 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ओमिक्रॉनचे 4 नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेलमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 454 वर पोहोचली आहे.
 
ओमिक्रॉनचे किती रुग्ण? मुंबई : 327
 
पिपंरी-चिंचवड : 26
 
पुणे ग्रामीण : 18
 
पुणे महापालिका, ठाणे महापालिका : 12
 
नवी मुंबई, पनवेल : प्रत्येकी 8 कल्याण,
 
डोंबिवली : 7 नागपूर,
 
सातारा : प्रत्येकी 6
 
उस्मानाबाद : 5 वसई
 
विरार : 4
 
नांदेड : 3
 
औरंगाबाद, बुलडाणा, भिवंडी, निजामपूर महापालिका, मीरा भाईंदर : प्रत्येकी 2 लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर : प्रत्येकी 1

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समृद्ध महाराष्ट्र, बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, आव्हानांवर मात करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे