Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Black Fungus: डोळे-नाक-जबड्यावर काळी बुरशीचा हल्ला, सरकार ने सांगितले लक्षणं व बचावाचे उपाय

Webdunia
शनिवार, 15 मे 2021 (13:36 IST)
कोरोनामधील विनाश दरम्यान, म्यूकरमाइकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसचे वाढत असलेले प्रकरण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकांना ब्लॅक फंगसच्या सुरुवातीचे चिन्हे ओळखून यापासून टाळण्याचा सल्ला दिला आहे. यासंबंधी प्रकरण सर्वात जास्त महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. हर्ष वर्धन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की जागरूकता आणि लवकर लक्षणे ओळखून त्याचा धोका टाळता येतो.
 
Mucormycosis म्हणजे काय- म्युकरमायकोसिस कोरोना विषाणूमुळे होणारी बुरशीजन्य संसर्ग आहे. कोविड-19 टास्क फोर्सच्या एक्सपर्ट्सप्रमाणे जे आधीपासूनच काही रोगाने झगडत आहेत आणि ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, त्यांच्यामध्ये हे सहजतेने पसरते कारण अशा लोकांची संक्रमणाशी लढण्याची क्षमता कमी झालेली असते.
 
कोणाला धोका- इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च प्रमाणे, केवळ काही विशिष्ट परिस्थितींमध्ये कोरोना रूग्णांमध्ये म्यूकोरामायकोसिस होण्याचा धोका जास्त असतो. अनियंत्रित मधुमेह, स्टिरॉइड्समुळे कमकुवत प्रतिकारशक्ती, दीर्घकाळापर्यंत आयसीयू किंवा हॉस्पिटलायझेशन, इतर कोणताही रोग, अवयव प्रत्यारोपण, कर्करोग किंवा व्होरिकोनाझोल थेरपी (गंभीर बुरशीजन्य संसर्गाचा उपचार) या बाबतीत काळ्या बुरशीचे धोका वाढू शकतो.
 
लक्षणं- ब्लॅक फंगसचे मुख्य लक्षणं डोळे लाल होणे किंवा वेदना जाणवणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, उलटीत रक्त येणं किंवा मानसिक स्थितीत परिवर्तन. या लक्षणांवर बारकाईने नजर ठेवली पाहिजे.
 
कशा प्रकारे पसरतं- एक्सपर्ट्सप्रमाणे हवेत पसरलेल्या जंतूंच्या संसर्गामुळे एखादी व्यक्ती बुरशीजन्य संसर्गाचा बळी बनू शकते. रुग्णाच्या त्वचेवरही काळा बुरशीचा विकास होऊ शकतो. त्वचेवर जखम, घासल्यामुळे किंवा जळजळ होण्यामुळे हे शरीरात प्रवेश करू शकते.
 
म्युकरमायकोसिस पासून कसे वाचाल- ब्लॅक फंगसपासून बचावासाठी धूळ असलेल्या ठिकाणांवर मास्क लावून जावे. माती, शेवाळ किंवा खाद या सारख्या वस्तूंजवळ जाताना जोडे, ग्लव्ज, फुल स्लीव्स कपडे घालावे. स्वच्छतेकडे लक्ष द्यावं. मधुमेहावर नियंत्रण, इम्युनोमॉड्यूलेटिंग ड्रग किंवा स्टेरॉयडचं कमीत कमी वापर करावं.
 
Black Fungus पासून बचावासाठी काय करावे- हायपरग्लीसीमिया (ब्लड शुगर) नियंत्रित ठेवा. कोविड-19 हून रिकव्हरीनंतर ब्लड ग्लूकोज लेवल मॉनिटर करत राहा. स्टिरॉइडचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा. ऑक्सिजन थैरेपीच्या वेळी ह्यूमिडिडिफायरसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करा. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे वापरा.
 
काय टाळावे- ब्लॅक फंगसपासून बचावासाठी याच्या लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. बंद नाक असलेल्या सर्व प्रकरणांना बॅक्टीरियल साइनसाइटिस समजण्याची चूक करु नका. विशेष करुन कोविड-19 व इम्यूनोसप्रेशन प्रकरणात अशी चूक करु नका.
 
फंगल एटियोलॉजी बद्दल माहिती करण्यासाठी KOH टेस्ट व मायक्रोस्कोपीची मदत घेयला घाबरु नका. जर डॉक्टर्स लगेच उपचार घेण्यास सांगत असल्यास दुर्लक्ष करु नका. रिकव्हरीनंतर देखील सांगण्यात आलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका कारण बर्‍याच प्रकरणांमध्ये, अगदी बुरशीजन्य संसर्गामध्ये रिकव्हरी झाल्यावरही एका आठवड्यात किंवा महिन्याभरानंतर पुन्हा झाल्याचे पाहिले गेले आहे.
 
उल्लेखनीय आहे की म्युकरमायकोसि‍सचे प्रकरण आता महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये देखील वाढत आहे. सध्या गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड व राजस्थान येथे ब्लॅक फंगसचे प्रकरणं पाहायला ‍मिळत आहे. यामुळे रुग्णाच्या डोळ्याला, नाकाच्या हाडांना आणि जबड्यालाही बरेच नुकसान होऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जण ठार

पुढील लेख