Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'या' जिल्ह्यांमध्ये केंद्रीय पथक दाखल होणार

central teams
, सोमवार, 4 मे 2020 (16:04 IST)
सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय पथकं तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून अशी २० पथकं तयार करण्यात आली आहेत. ज्यांच्या माध्यमातून कोविड प्रभावित क्षेत्रांमध्ये पाहणी करण्यात येणार आहे. शिवाय स्थानिक प्रशासनाच्या कोरोनाविरोधातील लढाईमध्ये ही पथकं मोलाचं सहकार्य करणार आहेत.
 
या यादीत मुंबई, ठाणे आणि पुण्याचा समावेश आहे. महाराष्ट्रा इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिवाय मुंबई, पुणे आणि ठाणे या भागांमध्येही कोरोना अतिशय वेगाने फोफावताना दिसत आहे. त्यामुळे या विषाणूवर आळा घालण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्थानिक प्रयत्नांना आता थेट केंद्रीय पथकांचीच साथ मिळणार आहे. 
केंद्रीय पथकं तैनात होणार असणारे जिल्हे खालीलप्रमाणे ... 
मुंबई (महाराष्ट्र),अहमदाबाद (गुजरात),दिल्ली (दक्षिण पूर्व), इंदुर (मध्य प्रदेश),पुणे (महाराष्ट्र),जयपूर (राजस्थान), ठाणे (महाराष्ट्र), सुरत (गुजरात), चेन्नई (तामिळनाडू), हैदराबाद (तेलंगाना), भोपाळ (मध्य प्रदेश), जोधपूर (राजस्थान), दिल्ली (मध्य), आग्रा (उत्तर प्रदेश), कोलकाता (पश्चिम बंगाल), कर्नूल (आंध्र प्रदेश), वडोदरा (गुजरात), गुंटूर (आंध्र प्रदेश), क्रिष्णा (आंध्र प्रदेश), लखनऊ (उत्तर प्रदेश) .

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशात पहिल्यांदाच आफ्रिकी स्वाईन फ्लूचा शिरकाव