Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'यांनी' संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी : मुख्यमंत्री

cm uddhav thackeray
, बुधवार, 8 एप्रिल 2020 (16:14 IST)
“ज्यांनी सैन्यातील आरोग्य विभागात काम केलं आहे किंवा जे डॉक्टर्स, परिचारिका किंवा वॉर्डबॉय निवृत्त झाले आहेत त्यांनी आमच्यासाठी संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. राज्याच्या जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
 
ज्यांनी सैन्य दलातील आरोग्य विभागात काम केलं आहे. तसंच जे डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय हे निवृत्त झाले आहेत किंवा ज्यांनी याबाबत शिक्षण घेतलं आहे आणि ज्यांना काम मिळालं नाही, त्यांनी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ज्यांना या युद्धात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी Covidyoddha@gmail.com या ईमेल आयडीवर नाव, नंबर, संपर्काचा पत्ता यासह संपर्क साधावा, असंही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाची तपासणी खासगी लॅबमध्ये मोफत करावी : सुप्रीम कोर्ट